गणपतीत महामार्गावरील वाहतूककोंडीवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

गणपतीत वाहतूककोंडी टाळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे.
गणपतीत महामार्गावरील वाहतूककोंडीवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

रायगड : कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांचा यंदा 'वाहतूककोंडी व खड्डे मुक्त' प्रवास होईल, असा दावा रायगड पोलिसांनी केला आहे. त्यात वाहतूककोंडी टाळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार असून, जीवनावश्यक वस्तूंची वाहने वगळून या काळात इतर सर्व १६ टनांच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. गतवर्षी दोन ड्रोन कॅमेरे होते. यंदा त्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version