जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गणेशोत्सव, दहीहंडीवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरुच आहे. यासंदर्भात शिवसेना आमदारांची वर्षा बंगल्यावर बैठक संपली. गणेशोत्सव आणि दहीहंडी सणांच्या अडचणी संदर्भात तातडीची बैठक घेण्याबाबत शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. यावर सकारात्मक तोडगा काढला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
तसेच, गणेशोत्सव हा विषय शिवसेनेनी धरून लावला. आशिष शेलार यांची बैठक दहीहंडी यासाठी असावी. शिवसेनेचा जन्म उत्सवातून आहे. तर भाजपाची सत्ता आल्यानंतर अनेक छत्री उगावल्या असल्याची टीका आमदार अनिल परब यांनी भाजपवर केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.