गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर आला असताना विविध तांत्रिक कारणांमुळे मुंबई महापालिकेने तब्बल 281 मंडळांना मंडपासाठीची परवानगी नाकारली आहे.
गणेशोत्सवासाठी पालिकेकडे यावर्षी 3499 इतके अर्ज आले. दरम्यान विविध कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्यामुळे 281मंडळांना मंडप परवानगी नाकारली असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मात्र, पालिकेने यावर्षीपासून सुरू केलेल्या ऑनलाइन परवानगीच्या घोळामुळेच अनेक मंडळांना अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्या असा आरोप गणेशोत्सव समितीने केला आहे.
दोन वेळा अर्ज केल्याने 759 अर्ज नाकारण्यात आले आहेत. तर आतापर्यंत 2740 मंडळांना मंडपासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर 296 परवानग्या देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये 79 टक्के परवानग्या देण्याचे काम पूर्ण झाले असून फक्त 11 टक्के परवानग्या देण्याचे काम सुरू असून 10 टक्के मंडळांना परवानग्या नाकारण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.