भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशनानंतर नाईकांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्यावर अटकेची तांगती तलवार आहे. त्यासाठी आज नाईकांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. नाईकांनी वकिलांमार्फत ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता नाईकांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र, सुनावणी होईपर्यंत गणेश नाईकांवर अटकेची तांगती तलवार कायम आहे.
भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर २७ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा दावा करणाऱ्या महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे. नाईक यांच्यासोबत २७ वर्ष लिव्ह इनमध्ये राहून त्यांच्याकडून मला एक मुलगा आहे, परंतु ते त्याचा स्वीकार करण्यास नकार देत असल्यामुळे संबंधित महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.
पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नाईकांवर कारवाई न झाल्यामुळे पीडित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराच गुन्हा दाखल केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.