गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी मिळणार?

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी मिळणार?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाली असून त्याबत दुरूस्ती करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार नारायण राणेंनी केली होती. या मुद्द्यावर विधानपरिषदेत चर्चा करण्यात

आली.

 

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या चार चाकी वाहनांना टोलमाफी देण्याचा प्रयत्न करू. त्यावर बुधवारच्या बैठकीत निर्णय घेऊ असं आश्वासन चंद्रकांत

पाटील यांनी दिले.

 

त्याप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वी करण्यात येईल. यासाठी युद्ध पातळीवर कामाचे प्रयत्न सुरू आहेत.

 

15 ऑगस्टपर्यंत हे दुरूस्तीचं काम पूर्ण केलं जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version