Konkan Hapus Mango : गुजरातचा डोळा आता हापूसवर, कोकण आंबा बागायतदारांची चिंता वाढली, नेमकं प्रकरण काय

कोकणच्या मातीत आणि हवामानात घडलेला हा आंबा कोकणाची एक वेगळीच ओळख राखतो. मात्र ‘कोकण हापूस’ या जगप्रसिद्ध आंब्याला मिळालेल्या भौगोलिक मानांकनावर आता नवे वादंग निर्माण झाले आहे.
Konkan Hapus Mango : गुजरातचा डोळा आता हापूसवर, कोकण आंबा बागायतदारांची चिंता वाढली, नेमकं प्रकरण काय

संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेला ‘कोकण हापूस’ आंब्याची चव, सुगंध आणि गुणवत्ता जगात प्रसिद्ध आहे. कोकणच्या मातीत आणि हवामानात घडलेला हा आंबा कोकणाची एक वेगळीच ओळख राखतो. मात्र ‘कोकण हापूस’ या जगप्रसिद्ध आंब्याला मिळालेल्या भौगोलिक मानांकनावर आता नवे वादंग निर्माण झाले आहे. कोकणातील शेतकऱ्यांना सुरक्षित बाजारपेठ आणि आर्थिक बळ देणारे हे मानांकन 2018 मध्ये मिळाले असले, तरी त्यावर आता इतर राज्यांच्या दाव्यांमुळे संकट उभे ठाकले आहे.

हेही वाचा- Pro Wrestling League 2026: नोएडातील इनडोअर स्टेडियममध्ये रंगणार कुस्तीचा महाअखाडा; 15 जानेवारीपासून सुरू होणार प्रो रेसलिंग लीग

आता गुजरातने ‘वलसाड हापूस’ या नावाने GI मानांकन मिळवण्यासाठी अर्ज सादर केला आहे. यापूर्वी 2022 मध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने ‘हापूस आंबा’ या नावाने स्वतंत्र GI अर्ज दाखल केला होता आणि आता गुजरातने अर्ज सादर केल्यामुळे कोकण हापूसच्या एकमेवत्वावर आणि त्याच्या बाजारपेठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

हेही वाचा- Bayilone Ballipalike Trending Song : इंस्टा, शॉर्ट्स, रिल्सपासून अगदी लग्नात नवरा-नवरीसुद्धा या गाण्यावर थिरकले; काय आहे खास 'या' गाण्यात…

दरम्यान कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी गुजरातच्या ‘वलसाड हापूस’ नाल मिळवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर नाराजी व्यक्त करत, विरोध केला आहे. जर वलसाड हापूसला मानांकन मिळाले, तर कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असं डॉ. भिडे यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी आफ्रिकेतील मलावी देशातून येणाऱ्या ‘मलावी हापूस’ या नावावरही संघटनेने आक्षेप घेतला होता. डॉ. भिडे यांनी सांगितल्यानुसार, ‘कोकण हापूस’ हे नाव कोकणातील चार जिल्ह्यांत उत्पादित होणाऱ्या विशिष्ट आंब्यासाठीच आहे. भविष्यात ‘शिवने हापूस’ आणि ‘कर्नाटक हापूस’साठी अर्ज दाखल झाल्यास, त्यालाही कडाडून विरोध केला जाईल. 

हेही वाचा- Sudan Drone Attack: उत्तर आफ्रिकेतील सुदानमध्ये निमलष्करी दलांचा बालवाडीवर ड्रोन हल्ला; 33 मुलांसह 50 जणांचा मृत्यू

गुजरातमधील गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने 2023 मध्ये ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. याबद्दलची कागदपत्रे सादर करण्याची कार्यवाही सुरू केली असून या अर्जावर 30 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी पार पडली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version