नोटेवर गांधीच – आरबीआय

नोटेवर गांधीच – आरबीआय

देशाच्या चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चित्राऐवजी इतरही राष्ट्रपुरुषांचे चित्र झळकण्याची चर्चा समाज माध्यमांवर चांगलीच जोर धरत होती. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

भारताच्या सध्याच्या चलनात कसलाही बदल होणार नसल्याचे आरबीआयने ट्विट करत अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे. नोटांवरील गांधीजींचा चित्र बदलण्याच्या समाज माध्यमांवरील बातम्या खोट्या असून आरबीआय अशा कोणत्याही विचारात नसल्याची माहिती मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी दिली आहे.

यागेश दयाल यांनी ट्विट केले की, ‘आरबीआय सध्याच्या चलनी नोटांमध्ये झळकणारा राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचे चित्र बदल करण्याच्या विचारात असल्याचे समाजमाध्यमांवर झळकत  होते. मात्र, ही बातमी खोटी असून आरबीआय बँकेत असा कोणताही प्रस्ताव मांडण्यात आला नसल्याची नोंद घ्यावी.’

कोणती बातमी व्हायरल होत होती?

देशांच्या चलनी नोटांवरील राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या फोटो बदलण्याचा विचार आरबीआय करत आहे. रवींद्रनाथ टागोर आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा फोटो भारतीय चलनावर घेण्याचा विचारात आरबीआय आहे. इतके दिवस नोटांवर गांधीजींचा फोटो दिसत होता. मात्र, आता त्यांच्यासोबत रवींद्रनाथ टागोर आणि अब्दुल कलाम यांचाही फोटो चलनावर येण्याच्या विचारात आरबीआय आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version