कितीही रंगरंगोटी केली, तरी ‘हा’ गणपती काळवंडतोय!

कितीही रंगरंगोटी केली, तरी ‘हा’ गणपती काळवंडतोय!

गणपती बाप्पाचा महिमा अगाध आहे. महाराष्ट्रातील अनेक गणपतीची देवस्थानं ही जागृत देवस्थानं मानली जातात. तर, अनेक गणेशोत्सव मंडळांचे गणपतीही नवसाला पावणारे गणपती म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र डोंबिवलीमधल्या एका गणेशोत्सव मंडळातल्या एका गणपतीचा चमत्कार पाहून मात्र सर्व भक्त हैराण होतायत.

डोंबिवली परिसरातल्या 27 गावांपैकी दावडी गावात यादव नगर तुकाराम चौक येथे गेल्या 5 दिवसांपासून साई मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची श्री गणेशमूर्ती अचानक काळी पडू लागली. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्तेच नव्हे, तर परिसरातील नागरिकही आश्चर्यचकित झाले. यानंतर मूर्तीला रोज साफ करून तसंच अगदी रंगरंगोटी करूनही पुन्हा मूर्ती काळवंडू लागली. मूर्ती जवळ असणारी पूजेची छोटी मूर्ती आणि चांदी, तांब्याची भांडी, दागिनेही काळे पडत आहेत.

मंडळाचे यंदाचे हे 11 वे वर्ष आहे. यानंतर या मंडळाने पूजेसाठी दुसऱ्या ठिकाणाहून पुन्हा मूर्ती आणून स्थापना केली. मात्र ती मूर्तीदेखील काळी पडू लागली. यामुळे नेमकं हे कशामुळे घडतंय, याबद्दल सर्वांमध्येच संभ्रम निर्माण झाला.

काय आहे काळवंडणाऱ्या गणपतीची कथा?

 

शेवटी मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी आज पर्यावरण दक्षता मंडळाच्या सदस्यांना आमंत्रित केले.

सर्व परिस्थिती पाहता त्यांनी सांगितले की पर्यावरणातील प्रदूषण किंवा गणेश मूर्तीला जो रंग वापरतात त्यातील काही घटकांमुळे असे होऊ शकते. एमआयडीसी अंतर्गत हे दावडी गाव येत असल्याने या ठिकाणी प्रदूषणाचे साम्राज्य आहे. त्यामुळेही असं होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 
मात्र मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर विसर्जनापर्यंत मूर्ती हलवू शकत नाही. त्यामुळे विसर्जनानंतर दुसरी मूर्ती प्रयोग शाळेत नेऊन आपण त्यावर रासायनिक प्रक्रिया करून तपासण्या करून घेणार असल्याचं पर्यावरण दक्षता मंडळाच्या सदस्यांनी सांगितलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version