गजानन महाराजांच्या पालखी उपळा मुक्कामी

गजानन महाराजांच्या पालखी उपळा मुक्कामी

गजानन महाराजांची पालखी गेल्या दोन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात आहे. रविवारी दुपारच्या वेळी ही पालखी संत गोरोबा काकांच्या तेर नगरीत दाखल झाली होती. तेर नगरीत दाखल होताच संत गजानन महाराजांच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी दिंडीतील वारकऱ्यांनी संत गोरोबा काकांचे दर्शन घेतले. त्यानंतर किनी येथे आराम करून पालखीने पुढील मार्गावर प्रस्थान केले आहे. पालखीचा रविवारचा मुक्काम हा धाराशिव तालुक्यातील उपळा (माकडाचे) येथे असणार आहे. अखंड हरिनामाच्या जयघोषात राज्यातील लांब पल्ल्यांच्या पालख्यांपैकी एक असलेली ही पालखी मजल दरमजल करीत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version