गडचिरोलीत सतर्कतेचा इशारा, पुरामुळे 135 गावांचा संपर्क तुटला

गडचिरोलीत सतर्कतेचा इशारा, पुरामुळे 135 गावांचा संपर्क तुटला

जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली

 

गडचिरोलीत मंगळवार रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला असून, पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने तेथील बाजारपेठ आणि निवासी घरे पाण्याखाली बुडाली आहेत.

 

पुरामुळे 135 गावांचा संपर्क तुटला आहे. आरमोरी-गडचिरोली मार्गावरील गाढवी व खोब्रागडी या नद्याही फुगल्या आहेत. कुरखेडा तालुक्यातील सती नदीतील पाण्याची पातळी वाढली असून, अनेक नाले ओसंडून वाहत आहेत.

 

अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं. आणखी काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला असून, सतर्क राहण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version