नाशिकच्या ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला विमानांच्या निर्मितीसाठी ६८०० कोटी रुपयांची निधीला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांनी माहिती दिली आहे. ६० विमानांची निर्मिती करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या कामामुळे आणि दिलेल्या निधीमुळे ओझर येथील एच.ए.एल कंपनीच्याकामाला मिळणार वेग मिळणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नाशिक येथील ओझर येथे स्थित एच.ए.एल. ला ७० एचटीटी च्या 40 एअरक्रॉफ्टची निर्मिती करण्यासाठी ६ हजार ८२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी एच.ए.एल.ओझर येथील अखंड कनेक्टिव्हीटी व तेथील उपलब्ध मनुष्य बळाची संख्या लक्षात घेता व विविध प्रकारची यशस्वी विमाने तयार करण्याचा एचएएल प्रशासनाचा अनुभवाच्या जोरावर हे काम एचएएल कंपनीला मिळावे यासाठी संरक्षणमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत व एच.ए.एल. प्रशासनाकडे गेल्या काही वर्षांपासून कामाचा कमी झालेला ओघ विचारात घेता केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी एच.ए.एल. ला ६० विमानांची निर्मिती करण्यासाठी उत्पादनास मंजूरी दिल्याची माहिती लेखी पत्राद्वारे दिली आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.
न्यू इंडिया २०२२ रणनिती अंतर्गत भारताने सर्व क्षेत्राचा समतोल विकास करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यात संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एच.ए.एल. ही प्रतिष्ठीत भारतीय सरकारी मालकीची एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी असल्याचा नाशिकला अभिमान आहे. १९६४ पासून एच.ए.एल. देशाच्या संरक्षण उत्पादनात सक्रीय सहभाग घेत आहे. केंद्र सरकारच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांच्या दृष्टीने देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी नाशिक एच.ए.एल. कंपनीस या विमान उत्पादनाचे कंत्राट दिल्यास नाशिक विभागासाठी सन्मानाची बाब ठरेल, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.