पेट्रोल आणि डिझेलचे दर कपात

पेट्रोल आणि डिझेलचे दर कपात

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला. पेट्रोल 2 रुपये 16 पैशांनी स्वस्त झालंय. तर डिझेल 2 रुपये 10 पैशांनी स्वस्त झालं. नवे दर लागू झाले.

 

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती. मात्र, या वेळेस तेल कंपन्यांनी दरात कपात करुन ग्राहकांना दिलासा दिला.

 

दरम्यान, 30 एप्रिलला पेट्रोल 1 पैसे आणि डिझेल 44 पैशांनी महागलं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version