जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्य सरकारने पेट्रोलवर तीन रुपये अधिभार वाढविल्याने शुक्रवार मध्यरात्रीपासून पेट्रोल तीन रुपयांनी महागलं आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर अधिकचा ताण पडला आहे.
राज्यात प्रति लिटर पेट्रोलवर 6 रुपये अधिभार लावण्यात येतो. आता राज्य सरकारच्या वित्त मंत्रालयाने अधिभार वाढवून 9 रुपये केला आहे. तसंच 26 टक्के मूल्यवर्धित कर आणि 9 रुपये अधिभार लावल्यामुळे पेट्रोल तीन रुपयांनी महाग झाले आहे.
हा अधिभार राज्यात दुष्काळ पडल्यामुळे राज्य सरकारने लावला होता. दुष्काळी भागातील पीडितांच्या आर्थिक मदतीसाठी या रकमेचा उपयोग करण्यात येत होता.
दुष्काळी मदत अधिभाराची मुदत 31 मार्च 2017 रोजी संपलेली आहे. सद्यस्थितीत राज्यात दुष्काळी परिस्थिती नाही, त्यानंतरही अधिभाराची वसुली सुरूच आहे. आता सरकारने दुष्काळी मदत हा शब्द हटवून अधिभार वाढवला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.