जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कडाक्याच्या थंडीत सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते. मात्र, याचा त्रास पहाटे प्रवासाला निघणाऱ्या चाकरमान्यांना होत असतो.
धुक्यांमुळे लोकल उशीराने धावत असतात. त्यामुळे कर्जत आणि कसाराहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
18 तारखेपासून नवीन वेळापत्रकानुसार लोकल धावू लागतील.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.