गोव्यात रेल्वे स्थानकावर चिमुरड्याचे अपहरण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

गोव्यात रेल्वे स्थानकावर चिमुरड्याचे अपहरण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

वृत्तसंस्था, गोवा

गोव्याच्या मार्गो स्टेशनवर एका 3 वर्षाच्या मुलाचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. कर्नाटकातील हुबळी जवळ राहणारं कुटुंब मार्गो स्थानकावर झोपलं होतं. यावेळी एका नराधमानं डाव साधत त्याला उचलून नेलं. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्हीत कैद झालीय.

दरम्यान याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीचा पुढील शोध सुरु आहे. मार्गो स्टेशन हे रात्रीच्या वेळीही गजबजलेलं असते. मात्र, यावेळीही त्या नराधमानं 3 वर्षाच्या चिमुरड्याला पळवून नेले. त्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version