‘उद्धव गटाचे चार आमदार शिवसेनेत येणार’

‘उद्धव गटाचे चार आमदार शिवसेनेत येणार’

राज्यात एकीकडे अजित पवार यांचा एक मोठा गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे खातेवाटपाची जोरदार चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेगटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील आणखी ४ आमदार आमच्या संपर्कात आहे, असा दावा शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ते आज अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधत होते.

दोन महिन्यांपूर्वी उदय सामंत यांनी सांगितलं होतं की ठाकरे गटातील सहा आमदार शिवसेना शिंदे गट येणार त्यापैकी आता २ आमदार शिवसेना शिंदे गटात आले आहे. आता आणखी चार आमदार आमच्या संपर्कात आहे, ते चारही जण वेळेवर येतील, असा दावाच उदय सामंत यांनी केला आहे.‘शिवसेनेचे कोणतेही आमदार ठाकरे गटाकडे परत जाणार नाही. सहानभूती मिळावी आणि आपल्या गटातील लोक स्वतःच्या ताब्यात राहावे यासाठी शिंदे गटाचे आमदार आमच्या संपर्कात आहे असे ठाकरे गटाचे नेते सांगत आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

तसेच, आजही सांगतो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. लवकरच विस्तार होणार आहे आणि सर्वांना विश्वासात घेऊन केला जाणार आहे, मी सध्या अमरावतीत आहे, मुंबईत काय घडतंय याबद्दल मला कल्पना नाही, असेही सामंत म्हणाले. बच्चू कडू हे काही नाराज नाही, त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. आमच्यात जे ४० आमदार आहे, त्यांना सुद्धा न्याय मिळाला नाही. बच्चू कडू यांनी आपली भावना व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे योग्य न्याय देतील आणि योग्य निर्णय घेतील, असेही सामंत म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version