गोबरगॅसमध्ये पडून चौघांचा मृत्यू

गोबरगॅसमध्ये पडून चौघांचा मृत्यू

गोबरगॅसच्या टाकीतील वायूमुळे चौघांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यातील बारामती तालुक्यातील खांडज येथे घडली. या घटनेत एकजण अत्यवस्थ असून त्याला बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत पिता-पुत्रासह चुलत्याचा आणि अन्य एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

प्रकाश सोपान आटोळे, प्रवीण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे व बापूराव लहूजी गव्हाणे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास खांडज गावच्या हद्दीत २२ फाट्याजवळील आटोळेवस्ती येथे ही घटना घडली.

गोबरगॅसच्या टाकीमध्ये पडल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर तात्काळ वरील चौघांना बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. या घटनेत आणखी एक जण अत्यवस्थ असून त्याला सिल्व्हर ज्युबिलीतून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version