एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला एनआयएकडून अटक

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला एनआयएकडून अटक

मुंबई: मनसुख हिरेन आणि स्फोटकं प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला राजहतरीय तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून त्यांच्या घरावर छापेमारी सुरू होती. या छापेमारीनंतर एनआयएने चौकशीसाठी नेलं. आता मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.

मनसुख हिरेन प्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा आरोप प्रदीप शर्मा यांच्यावर करण्यात आला आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता प्रदीप शर्मालासुद्धा अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर प्रदीप शर्माही एनआयएच्या रडारवर होते. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारी करत एनआयएने त्यांना ताब्यात घेतले होते. अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात याआधीही दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा थोड्याच वेळात प्रदीप शर्मा यांना न्यायालयात हजर करणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version