नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. तब्येतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना जामीन देण्यात आला. ईडीने या जामिनाला विरोध केला. पण तब्येतीच्या कारणाची दखल घेऊन नवाब मलिक यांना २ हंगामी जामीन देण्यात आला आहे. जामिनावर असताना नवाब मलिक यांना काही अटींचे पालन करावे लागेल.
नवाब मलिक हे फेब्रुवारी २०२२ पासून तुरुंगात होते. ते वारंवार जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांचा अर्ज फेटाळला जात होता. अखेर सर्वोच्च न्यायालयात तब्येतीचे कारण देत नवाब मलिक यांनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. हा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला. जामिनाशी संबंधित तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर नवाब मलिक तुरुंगाबाहेर येणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.