माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत शिवसेनेत

माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत शिवसेनेत

राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दीपक सावंत हे उद्धव गटाचे समर्थक आहेत. याआधी उद्धव गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर बुधवारी दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उद्धव गटाला मोठा धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी, आरोग्य क्षेत्रातील जाणकार माणूस आमच्याकडे आला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच सावंतांना बळजबरीने राजकारणातून दूर करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

डॉ. दीपक सावंत यांचा परिचय

डॉ. सावंत बाळासाहेबांचे निष्ठावान


आरोग्यमंत्री असताना आदित्यसोबत गैरसमज


मित्राला बसवून ठेवल्याने सावंतांवर आदित्य नाराज झाल्याची चर्चा


आदित्य नाराज, सावंतांना मातोश्रीने अडगळीत टाकले.


उद्धव मुख्यमंत्री असताना सावंतांनी आरोग्यविषयक जबाबदारी मागितली.


मुलाच्या नाराजीमुळे सावंतांकडे उद्धव यांचेही सतत दुर्लक्ष.


डॉ. दीपक सावंत यांचे आदिवासी भागात आरोग्यविषयक सतत कार्य.


जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version