इंडिया आघाडीकडून समन्वय समितीची स्थापना

इंडिया आघाडीकडून समन्वय समितीची स्थापना

मुंबई,१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : 

आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीकडून आज महत्त्वाची रणनीती आखण्यात आली. इंडिया आघाडीची मुंबईतील दोन दिवसीय बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. १३ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्याबरोबरच तीन मोठे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे ठराव महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर चार समित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे.

आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीकडून आज महत्त्वाची रणनीती आखण्यात आली. या रणनीतीचा एक भाग म्हणून हे तीन ठराव करण्यात आले आहेत. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झालीय. या मुद्द्यांबाबत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यानंतर कॅम्पेन कमिटी, वर्किंग ग्रुप ऑफ सोशल मीडिया, वर्किंग ग्रुप ऑफ मीडिया आणि वर्किंग ग्रुप ऑफ रिसर्च या चार समितींची देखील स्थापना करण्यात आली आहे. सर्व पक्षांचे नेत्यांचा या कमिटींमध्ये समावेश करण्यात आला आहे”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

इंडिया आघाडीचा लोगो अद्याप ठरलेला नाही. त्यासाठी काही सूचना आणि प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. ते आल्यानंतर त्यातून लोगो ठरवण्यात येणार आहे. त्याशिवाय जागावाटपावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. जागावाटपाबाबत घाई करू नये असं काँग्रेसला वाटतं. पुढच्या काही महिन्यांत देशात पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यांचे निकाल आल्यानंतर जागावाटपाचा निर्णय व्हावा, असं काँग्रेसला वाटतं. तसं झाल्यास काँग्रेसला आपली बाजू मजबूत करता येईल असा पक्षातील सूत्रांचा होरा आहे.

इंडिया बैठकीतील तीन ठराव –

१. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचा आगामी लोकसभा निवडणुका शक्य तितक्या एकत्र लढण्याचा संकल्प. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागा वाटपाची व्यवस्था ताबडतोब सुरू केली जाईल आणि लवकरात लवकर जागा वाटपाची ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

२. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष देशातील वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रितपणे सार्वजनिक रॅली आयोजित करणार आहेत.

३. आम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष विविध भाषांमध्ये ‘जितेगा भारत’ या थीमसह आमच्या सर्व धोरणे आणि मोहिमांमध्ये समन्वय साधण्याचा संकल्प करतो.

समन्वय समितीचे १३ सदस्य

१. के. सी वेणुगोपाल
२. शरद पवार
३. हेमंत सोरेन
४. संजय राऊत
५. तेजस्वी यादव
६. अभिषेक बॅनर्जी
७. राघव चढ्ढा
८. जावेद अली खान
९. लल्लन सिंह
१०. डी राजा
११. उमर अब्दुल्ला
१२. मेहबुबा मुफ्ती
१३. टी. आर. बालू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version