‘दिवसाला 160 पोळ्या’; महिलेचे कुत्र्यावरील प्रेम बघून व्हाल थक्क

‘दिवसाला 160 पोळ्या’; महिलेचे कुत्र्यावरील प्रेम बघून व्हाल थक्क

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूरच्या जया वानखेडे या सामान्य गृहिणी आहेत. पण सध्या त्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. त्याचे कारणही तसंच आहे. जया वानखेडे या दररोज दोन वेळच्या एकूण 160 पोळ्या, चार लिटर दूध आणि पेडिग्रीचं एक मोठं पॅकेट घेऊन त्या टू व्हीलरनं अंबाझरी तलाव, एमआयडीसी, हिंगणा या चौकातील रस्त्यावरच्या कुत्र्यांना नित्यक्रमानं खाऊ घालत असल्याचं पाहायला मिळतंय.

जया यांचा दिवस ब्रह्ममुहूर्तावर सुरू होतो. पहाटे उठून त्या दररोज जवळपास 80 पोळ्या बनवतात. आणि कुत्र्यांना खायला घालतात. आणि त्यांच्या तब्येतीची देखील काळजी घेत असतात. हे सर्व त्या कोणाच्याही मदतीशिवाय स्वत: करत असतात ही विशेष बाब आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version