विधीमंडळाच्या प्रांगणात फुटबॉल सामना, आमदारांच्या मॅचला मुख्यमंत्र्यांची कमेंट्री

विधीमंडळाच्या प्रांगणात फुटबॉल सामना, आमदारांच्या मॅचला मुख्यमंत्र्यांची कमेंट्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एरव्ही विधानसभा म्हटलं की वादविवादांचा आखाडा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी असा सामना रंगताना दिसतो. पण बुधवारी महाराष्ट्राच्या विधीमंडळ प्रांगणात एक वेगळाच सामना रंगला. हा सामना होता फुटबॉलचा.

 

सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा भारतात होऊ घातलीय त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन इलेव्हन मिलियन अशी घोषणा केली. त्याला प्रतिसाद देत क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनीही महाराष्ट्र फुटबॉलमय करण्याची घोषणा केली.

 

याच अभियानाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी विधीमंडळ परिसरात आमदारांचा फुटबॉल सामना आयोजीत करण्यात आला होता. अध्यक्ष XI विरुध्द सभापती XI असा हा सामना रंगला. याला खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कॉमेंट्री केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version