स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेणारा अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात खरातसोबतच त्याची पत्नी आणि मुलगा देखील गोत्यात आल्याचे पाहायला मिळाले.शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थानिक पोलिस आणि SIT पथक खरात याच्या तृप्तबाला या बंगल्यावर पोहचण्यापूर्वी खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्यामुळे त्यांचा मुलगा हर्षवर्धन हा पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्यानंतर हर्षवर्धनची SIT पथकाकडून दोन दिवस चौकशी करण्यात आली.
यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भोंदू अशोक खरातच्या पत्नी कल्पना खरातनंतर आता त्यांचा मुलगा हर्षवर्धन देखील गायब असून, खरातच्या मुलाचा फोनही नॉट रीचेबल दाखवत आहे. यामुळे भोंदू अशोक खरात प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. पोलिसांच्या हाती लागल्यानंतर खरातच्या मुलाची दोन दिवस एसआयटीकडून कसून चौकशी करण्यात येत होती. मात्र चौकशीनंतर तपास यंत्रणांची कोणतीही परवानगी न घेता खरातचा मुलगा शहरातून गायब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या मोबाईलवर कॉल करण्यात आला, मात्र खरातच्या मुलाचा मोबाईल बंद असल्याने तपास यंत्रणांनी खरातच्या निवासस्थानी शोध घेतला असता मुलगा मिळून आला नाही. मुलाचा मोबाईल नॉट रीचेबल असल्याने तो कुठे गेला? त्याच्यासोबत कोण आहे? याचा शोध सुरू आहे. तर खरातची पत्नी देखील गुन्हा दाखल झाल्यानंतर आहे फरार
खरातची पत्नी कल्पना खरात फरार
शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात शिर्डी पोलिसांत अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अशोक खरातच्या पत्नीला ताब्यात घेण्यासाठी महिला पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होण्याआधीच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलिस आणि SIT च्या पथकातील महिला अधिकारी आणि एक पुरुष पोलिस अधिकारी खरात याच्या तृप्तबाला या बंगल्यात दाखल झाले होते. कल्पना खरातला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक नाशिकच्या अशोक खरातच्या घरी गेले असता कल्पना खरात घरात नव्हती. कल्पना खरात फरार झाल्यामुळे त्यांचा मुलगा हर्षवर्धन हा पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्यानंतर हर्षवर्धनची SIT पथकाकडून तब्बल एक तास चौकशी करण्यात आली. अशातच कल्पना खरात यांना अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस कल्पना खरातच्या मागावर आहे. कल्पना खरातच्या अटकेसाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेनं रवाना झाले आहेत. त्यामुळे अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.