चारा घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना अपराधी ठरवले असून त्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सीबीआय न्यायालयाने सुनावली आहे. तसेच लालूप्रसाद यादव यांना ६० लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.
सीबीआय न्यायालयाने चार घोटाळा प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षाचा कारावास आणि ६० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे याप्रकरणी लालू प्रसाद यादव उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
१५ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांच्यासह ७५ आरोपींना चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरवले होते. याप्रकरणी २४ जणांची निर्दोष सुटका करण्यात आली होती तर ३६ जणांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच इतर दोषींना आज दूरदृश्यप्रणालीद्वारे शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव यांच्याविरोधातील हा पाचवा चारा घोटाळा आहे.
प्राण्यांचा चारा, औषधं, पशूपालन उपकरणांचा घोटाळा.
९०० कोटींचा घोटाळा १९९६ साली आला होता उघडकीस.
बिहारचे तत्कालीन मंत्री लालू प्रसाद यादव हे मुख्य आरोपी.
२३ जून १९९७ मध्ये लालू प्रसाद यादवांसह ५५ जणांविरोधात आरोपपत्र.
२९ जुलै १९९७ रोजी लालू प्रसाद यादव यांना अटक.
१३ डिसेंबर १९९७ मध्ये यादव यांची तुरुंगातून सुटका.
२८ ऑक्टोबर १९९८ रोजी लालू प्रसाद यादव यांना पुन्हा अटक.
मार्च २०१२ मध्ये पाटणा कोर्टात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.