गैरवर्तणूक केल्यामुळे शाळेतून काढले; विद्यार्थाने उचलले टोकाचे पाऊल

गैरवर्तणूक केल्यामुळे शाळेतून काढले; विद्यार्थाने उचलले टोकाचे पाऊल

वृत्तसंस्था, अमेरिका

अमेरिकेतील फ्लोरिडात माजी विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 17 निष्पाप चिमुरड्यांना जीव गमवावा लागला. या प्रकरणी 19 वर्षीय आरोपी निकोलस क्रूझला अटक करण्यात आली आहे. फ्लोरिडातील पार्कलँड परिसरात असलेल्या स्टोनमन डग्लास हायस्कूलमध्ये  ही गोळीबाराची घटना घडली आहे. गैरवर्तनामुळे निकोलस क्रूझला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्या रागातून त्याने शाळेत घुसून गोळीबार केल्याची माहिती मिळतेय.

आरोपी निकोलसने सुरुवातीला फायर अलार्म वाजवला. त्यामुळे आग लागल्याच्या भीतीने विद्यार्थ्यांची पळापळ झाली. या परिस्थितीचा फायदा घेऊन त्याने अंदाधुंद गोळीबार केला. दरम्यान,  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं आहे. या घटनेनंतर स्टोनमन डग्लास हायस्कूल आठवड्याभरासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version