जम्मू काश्मीरमध्ये केंद्र शासनाने जमावबंदी केली आणि कलम 370 रद्द करण्यात आले. अजूनही जम्मू काश्मीरच्या काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सांगली कोल्हापूरमध्ये महापूराने थैमान घातले आहे. काही प्रमाणात या भागात पूर ओसरायला सुरूवात झाली आहे. सरकारने पुरग्रस्त भागात जमावबंदीचा आदेश दिले आहेत. यावर हे जनरल डायरचे सरकार आहे का?’ असा सवाल नवाब मलिक यांनी सरकारला केला आहे.
सांगली कोल्हापूरमध्ये महापूराने थैमान घातले आहे. काही प्रमाणात या भागात पूर ओसरायला सुरूवात झाली आहे. सरकारने पुरग्रस्त भागात जमावबंदीचा आदेश दिले आहेत. यावरती अनेक जण टीका करत आहेत. सरकारने पुरग्रस्त भागात 12 ते 24 ऑगस्ट दरम्यान जमावबंदीचे आदेश दिले आहेत. नवाब मलिक यांनी यावरून सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे.
एकीकडे शेतकर्यांना ‘ऐ तू गप्प बस’ अशा धमक्या दिल्या जातात. तर दुसरीकडे पुरग्रस्त भागात जनतेचा रोष दाबण्यासाठी भाजपाने जमावबंदी केली आहे. नवाब मलिक यांनी या शब्दात त्यांनी भाजपाला सुनावले आहे. यावर हे सरकार जनरल डायरचं सरकार आहे का? असा सवाल देखील नवाब मलिक यांनी केला आहे.
जनरल डायर सरकारला आम्ही घाबरत नाही. त्यांना उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजप सरकारला लक्ष केलं आहे. सरकारच्या या हुकुमशाही पद्धतीवर नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये केंद्र शासनाने जमावबंदी केली आणि कलम 370 रद्द करण्यात आले. अजूनही जम्मू काश्मीरच्या काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आणि आता पूरग्रस्त भागात जमावबंदी करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.