जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्यावरती खड्डे पाहायला मिळतात. नागरिक अनेकवेळा तक्रारी करुनही सरकार लक्ष देत नाही. मात्र, आता धक्कादायक बातमी समोर येते
ती म्हणजे खड्डे चक्क पाचशे कोटीचे आहेत.
ही धक्कादायक माहिती सरकारी कागदावर आढळून आली. मुंबई-गोवा या महामार्गावर पळस्पे ते इंदापूर चौपदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला.
पहिल्या टप्प्याचे काम सुप्रीम पनवेल इंदापूर तोल्वेज या खाजगी कंपनीला देण्यात आले होते. हा रस्ता अवघ्या 84 किलोमीटर इतका आहे.
हा रस्ता बनवण्यासाठी सरकारनं सुमारे 942 कोटी रुपयांची मंजुरी देऊन जानेवारी 2011मध्ये करारनामा कऱण्यात आला.
करारनाम्यानुसार हे काम 13 जून 2014पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र, 2017 उजाडूनसुद्धा हे काम अद्याप झालेले नाही. त्याचप्रमाणे गेल्यावर्षी ऑगस्ट
2016पर्यंत या महामार्गावरील चौपदीकरणाचे काम करण्यासाठी सरकारने पुन्हा 500 कोटींचे खर्च झाल्याचे सांगण्यात आले असून सरकारी माहिती समोर आली.
तर, 2016मध्ये हा महामार्ग खड्ड्यात गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.