दादरच्या फुल बाजारात गोळीबार!

दादरच्या फुल बाजारात गोळीबार!

मुंबईमधील गजबजलेल्या दादर फुल मार्केटच्या गोळीबार झाला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.

 

अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केला असून मृत व्यक्तीचं नाव मनोज मौर्या असून त्याचं वय 35 असल्याचं सांगण्यात येतआहे. मनोज मौर्य फुल मार्केटमध्ये वजनकाटा पुरवण्याचं काम करत होते. हल्लेखोर दुचाकीवरुन आले होते. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. हल्लेखोरांनी मागून केलेल्या गोळीबारात मनोज मौर्य यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून अंतर्गत वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मनोज मौर्या यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहे.

 

दादर फुल मार्केट गजबजलेला परिसर असून अशा ठिकाणी दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी गोळीबार झालेला परिसर सील केला असून सध्या तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version