जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिक महापालिकेतील अग्निशमन दलाच्या चालकाने महापालिकेला तब्बल 9 लाख 52 हजारांचा गंडा घातलाय. या चालकानं अग्निशमन दलाच्या टँकर आणि बंबामध्ये डिझेल भरल्याच्या पावत्या कार्यालयात जमा केल्या. मात्र, प्रत्यक्षात त्याने पेट्रोल किंवा डिझेल भरलंच नव्हतं. रवींद्र भोळे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
या प्रकरणी चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. आणि धक्कादायक बाब म्हणजे फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याआधीच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, अजूनही त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.