नाशिक, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत. व्यापाऱ्यांनी बेमुदत लिलाव बंदचा निर्णय मागे घेतला असून अखेर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या मध्यस्तीला यश आलेलं आहे. व्यापाऱ्यांनी लिलाव बंदचा निर्णय मागे घेतल्याने उद्यापासून कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत.
मागच्या तीन दिवसांपासून हे लिलाव बंद होते. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्यासाठी भारत सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन भारती पवार यांनी दिलं. त्यानंतर कांद्याचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.