‘एक – दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार’

‘एक – दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार’

शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष पदावरून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला संपूर्णं महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विरोध होत आहे. तसेच शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे.

तर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी गुरुवार संवाद साधला. येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार. तुम्हाला हवा तसा निर्णय घेणार आहे, असं म्हणत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. चव्हाण सेंटरच्या बाहेर कार्यकर्ते दोन दिवसांपासून घोषणाबाजी करत अन्नत्याग करून बसलेली होती.

“पक्षाच्या भवितव्यासाठी मी राजीनाम देण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेताना सहकाऱ्याशी चर्चा करण्याची गरज होती. परंतु मला खात्री होती की, तुम्ही हा निर्णय मान्य केला नसता. त्यावेळी तुम्हाला विश्वासात घेतले नाही. आता मला वाटते की, तुम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते. ” असे पवार म्हणाले.कार्यकर्त्यांचा भावनेचा मी आदर करतो. तुम्हाला आंदोलनाची गरज पडू देणार नाही. तुम्हाला हवा तो निर्णय येत्या एक दोन दिवसात घेतो, असंही पवार म्हणाले.

चव्हाण सेंटरच्या बाहेर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. सुप्रिया सुळे यांनीही मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे न ऐकता आम्ही आमच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगत सक्षणा सलगर, मेहबूब शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेलती आहे. दरम्यान, शरद पवारांनी यावळी जमा झालेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी तुमच्या भावनांचा आदर करून येत्या एक दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version