‘पुढील आठवड्यात सर्व खड्डे बुजवा’

‘पुढील आठवड्यात सर्व खड्डे बुजवा’

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: मुंबईत १५ ऑगस्टपासून मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपती मूर्तींच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. आगामी ३ सप्टेंबरला रविवार असून, त्या दिवशी मोठ्या मंडळांच्या ११ गणेशमूर्ती, ९ सप्टेंबरला आठ, तर १० सप्टेंबरला २७ मोठ्या गणेशमंडळांच्या मूर्तींचे आगमन होणार आहे. ही संख्या पुढे आणखी वाढत जाईल. त्यामुळे त्यापूर्वीच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

यंदा १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे गणपती आगमन-विसर्जनावेळीही याचा त्रास गणेशमंडळांना होऊ शकतो, अशी कुजबूज मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

‘यंदाच्या गणेशोत्सवात गणेश मूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरळीत व्हावे, यासाठी आगमन-विसर्जन मार्गांचा आढावा घ्या. तसेच त्या मार्गांवर खड्डे आढळून आल्यास पुढील आठवड्याच्या आत ते बुजवा,’ असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती आगमन-विसर्जन मार्गांचा आढावा पालिका आयुक्तांनी घेतला. यावेळी खड्डे बुजवणे, आवश्यक ठिकाणी डागडुजी करणे, गणेश मंडळांच्या परिसरात स्वच्छता राखणे, विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था राखणे, गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानग्या देणे आदी आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात चहल यांनी मध्यवर्ती यंत्रणांसह परिमंडळीय सहआयुक्त, उप आयुक्त, २४ विभागांचे सहायक आयुक्त तसेच संबंधित यंत्रणांना आदेश दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version