#FifaWorldCup2018 इंग्लंडची ट्युनिशियावर मात, कर्णधार हॅरी केन ठरला विजयाचा शिल्पकार

#FifaWorldCup2018 इंग्लंडची ट्युनिशियावर मात, कर्णधार हॅरी केन ठरला विजयाचा शिल्पकार

वृत्तसंस्था, दिल्ली

फुटबॉल विश्वचषकाचे सामने उत्तरोत्तर चांगलेच रंगत जात आहेत. आज जी गटातला ट्युनिशिया वि इंग्लंड यांच्यातील सामना इंग्लंडने जिंकला आहे. इंग्लंडने ट्युनिशियावर 2-1 अशी मात करून, फिफा विश्वचषकात शानदार विजयी सलामी दिली.

इंग्लंडसाठी दोन्ही गोल कर्णधार हॅरी केन केल्याने तो या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

अकराव्या मिनिटाला अॅशली यंगच्या कॉर्नर किकवर जॉन स्टोन्सचा हेडर ट्युनिशियाचा गोलरक्षक हासेनन थोपवला. पण चेंडू हॅरी केनच्या दिशेनं उडाला. त्यानं तो चेंडू नेमका गोलपोस्टमध्ये धाडला. मग 35 व्या मिनिटाला फरजानी सासीनं पेनल्टी किकवर ट्युनिशियाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर हॅरी केननं एन्जुरी टाईममध्ये इंग्लंडचा दुसरा गोल झळकावला.

इंग्लंडने २-१ असा सामना जिंकत ट्युनिशियाला मात दिली. इंग्लंडसाठी दोन्ही गोल कर्णधार हॅरी केन याने केले. तो या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

या विजयामुळे जी गटात इंग्लंड आणि बेल्जियम पहिल्या स्थानावर आहेत.

#FifaWorldCup2018 स्वीडनचा दक्षिण कोरियावर विजय…

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version