वृत्तसंस्था, दिल्ली
फिफा विश्वचषकातील फ फुटबॉलच्या अरेना स्टेडियममध्ये फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगला. फ्रान्सने ऑस्ट्रेलियाचं आव्हान 2-1 असं मोडीत काढला. नऊ मिनिटांचा अवधी असताना फ्रान्सच्या पॉल पोग्बानं डागलेला गोल निर्णायक ठरला.
या सामन्यात फ्रान्सने बाजी मारली. 80 व्या मिनिटाला फ्रान्सच्या पोग्बाने गोल करुन 2-1 अशा गोलने आघाडी घेतली आणि फिफा विश्वचषकातला पहिला विजय नोंदविला.
सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या जेडीनाकने पहिला गोल केला. मात्र, दुस-या हाफमध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेली कडवी झुंज मोडीत काढत फ्रान्सने दोन गोल केले. 62 व्या मिनिटाला फ्रान्सने गोल करुन बरोबरी साधली.
अखेरच्या मिनिटांपर्यत फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.
#FiFaWorldCup2018 मोरॅक्कोचा स्वयंगोल, इराणचा विजय
#FiFaWorldCup2018 सामन्याच्या अंतिम क्षणी गोल करत उरुग्वेने पटकावला विजय…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.