#METOO मुळे अनेक प्रकरणं समोर आलेत. बाॅलिवूडमधील अनेक घटनाही उघडकीस आल्या. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने चित्रपटाच्या शुटिंगवेळी झालेल्या आरोपांवरून बाॅलिवूडमधील वातावरण तापलेले असतानाच आता हाऊसफुल्ल 4 च्या सेटवर एका ज्युनिअर आर्टिस्टवर सहा जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. चित्रकूट स्टुडिओमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे.
पवन शेट्टी हा याच चित्रपटात डान्सर म्हणून काम करायचा. या दोघांमध्ये जूना वाद होता. पवन शेट्टीनं शुटींग सुरु असताना काही मित्रांना घेऊन स्टुडिओत प्रवेश केला. तसंच या महिलेच्या मित्राला मारहाण केली. तेव्हा हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या या डान्सर महिलचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी अंधेरीच्या आंबोली पोलीस ठाण्यात पवन शेट्टी नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला गेला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.