जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली
दहा दिवसांच्या चिमुरडीला नराधम बापानं विष पाजल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली आहे.
दुसरी मुलगी झाल्याच्या रागातून या नराधम बापानं हे कृत्य केले.
दरम्यान या चिमुरडीची प्रकृत्ती अत्यावस्थ असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी अंजना जाधव यांच्या तक्रारीवरून आरोपी रामकिशन जाधव विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.