सुनेने ऐकले नाही म्हणून सासऱ्याला संताप अनावर झाल्याने त्याने चाकू हातात घेतला अन्…

सुनेने ऐकले नाही म्हणून सासऱ्याला संताप अनावर झाल्याने त्याने चाकू हातात घेतला अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

एका क्षुल्लक कारणावरुन कोल्हापुरमध्ये सासऱ्यानं आपल्या सुनेसह 2 नातवांवर चाकूचा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातल्या मल्हापेठ गावात ही घटना घडली आहे. चाकूच्या हल्ल्यात शुभांगी सातपुतेंसह चौघे जण गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींवर प्रमिलाराजे सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या प्रकरणी नजीकच्या कळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलीय.

अंघोळीसाठी पाणी ठेवण्याच्या कारणावरुन सातपुते कुटुंबामध्ये भांडणं झाली. पांडुरंग दशरथ सातपुते असं चाकूने हल्ला करणाऱ्या इसमाच नीव आहे. तर, शुभांगी रमेश सातपुते असं सूनेच नाव असून, मयुरेश रमेश सातपुते, मनीषा रमेश सातपुते असं चाकू हल्ला करणाऱ्या इसमाच्या नातवांच नाव आहे. दरम्यान, जखमींवर प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version