उर्से टोलनाक्याजवळ भीषण अपघात

उर्से टोलनाक्याजवळ भीषण अपघात

मुंबई , १९ मे २०२३, प्रतिनिधी : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी, (१९ मे) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सहांपैकी एक मुलगी जागीच मृत पावली असून अन्य पाचजण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारार्थ जवळील रुग्णालायात दाखल कऱण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे ३.०० च्या सुमारास उर्से टोल नाक्याजवळ पुणे लेन वर कारची (क्रमांक एमएच १२ एनजे २४१९) शोल्डर लेन वरील आयशर टेम्पोला (क्रमांक एमएच १२ टिवी ५०३९) धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की, त्यातील सहा जणांपैकी एक मुलगी जागीच मरण पावली. इतर जखमीना आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस व ऍम्ब्युलन्सच्या मदतीने उपचारार्थ हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version