Solapur Accident : सोलापूरात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! एसटी आणि ट्रकची जोरदार धडक; दोघांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी

सोलापूर शहरातील शेळगी परिसरात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. सोलापुरातून उमरग्याच्या दिशेने बस निघालेली असताना सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरील शेळगी जवळ हा भीषण अपघात झाला.
Solapur Accident : सोलापूरात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! एसटी आणि ट्रकची जोरदार धडक; दोघांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी

सोलापूर शहरातील शेळगी परिसरात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. सोलापुरातून उमरग्याच्या दिशेने बस निघालेली असताना सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरील शेळगी जवळ हा भीषण अपघात झाला. पुण्यातल्या कुरकुंभहून धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याला ही बस जातं होती, त्यावेळेस पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास बस सोलापूर एसटी स्टॅन्डवर पोहोचली.

हेही वाचा- Thane Bhiwandi Building Collapse: भिवंडीत चार मजली इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती तर मृतांच्या आकड्यात वाढ

त्यावेळेस सोलापूरातील शेळगी पुलावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या एसटी बसने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला तर दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापुरातील शेळगी परिसरात पहाटे 5 च्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. 

या अपघातात एसटी चालक आणि एक प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर जवळपास 10 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेत एसटी चालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय 43), आणि नागुबाई राम रेवगे अशी मृत्यू झालेल्यांची ओळख आहे. या घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला असून, अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version