सोमाटणे टोलनाक्यावर फास्टॅगचे पैसे परत मिळणार

सोमाटणे टोलनाक्यावर फास्टॅगचे पैसे परत मिळणार

१४ मार्च रोजी झालेल्या सोमाटणे टोलनाका हटवा आंदोलनाला आलेले यश म्हणजे मावळमधील वाहनचालकांना मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीपर्यंत टोलमध्ये१४ मिळालेली माफी. दिनांक १४ मार्च रोजी झालेल्या सोमाटणे टोलनाका हटवा आंदोलनाला आलेले यश म्हणजे मावळमधील वाहनचालकांना मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीपर्यंत टोलमध्ये मिळालेली माफी. मात्र तरीही आंदोलनाच्या दिवसापासूनच तालुक्यातील अनेक वाहनचालकांच्या फास्टॅगमधून सोमाटणे टोलनाका इथे पैसे कट झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर आता आयआरबी प्रशासनाने एक पत्रक कृती समितीला पाठवून आपण हे पैसे परत करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.

काय म्हटलंय आयआरबी प्रशासनाने ?

आयआरबी प्रशासनाच्या उच्चतम अधिकाऱ्याने सोमाटने टोल विरोधी कृती समिती यांना पत्र लिहिले आहे. ज्यात फास्टटॅगच्या माध्यमातुन मावळ विभागातील कारचे पथकर कपात होत असल्याबाबत स्पष्टपणे लिहीले आहे की, मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिनांक १४ मार्च रोजी दिलेल्या संदर्भीय सुचने नुसार आमचे कडून पालन करण्यात येत आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांसोबत दिनांक २८ मार्च नंतर बैठक आयोजित करण्यात येणार आहे, त्या बैठकी मध्ये दिल्या जाणाऱ्या सुचने नुसार आमचे कडुन पालन करण्यात येणार आहे. मात्र, ज्या स्थानिक विभागातील कारचे फास्टटॅगमधून सोमाटने पथकर नाक्यावर पथकर कपात झालेली आहे, त्या स्थानिक कारचे आर.सी बुक आणि आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करून खातरजमा केल्या नंतरच संबंधीत वाहनधारकाच्या बैंक खात्यावर फास्टॅग द्वारे वजावट झालेले पैसे जमा करण्याची दक्षता घेण्यात येईल, असे पत्र आयआरीबी अधिकाऱ्यांनी लिहून कृती समितीला पाठवले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version