चक्क घोड्यावरुन झाला बोंडअळीचा पंचनामा

चक्क घोड्यावरुन झाला बोंडअळीचा पंचनामा

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

बोंडअळीमुळे झालेल्या कापसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील काही अधिकारी आता थेट घोड्यावर स्वार होऊन शेतात जात असल्याचं समोर आलंय. आठ दिवसांमध्ये पंचनाम्याचे काम आटोपणे शक्य नसल्याने अधिकाऱ्यांनी घोड्याचा आधार घेतल्याचं औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात दिसून आलंय. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कपाशीचे क्षेत्र जवळपास 6 लाख हेक्टरच्यावर जात आहे.

 

 

या नुकसानीचे पंचनामे करुन आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आलेत. मात्र, पायी फिरून दहा दिवसात हे काम पूर्ण करणे अशक्य वाटत असल्याने अधिकाऱ्यांनी चक्क घोड्यावर बसून हे पंचनामे पूर्ण करण्याची शक्कल लढवली आहे. वैजापूर तालुक्यातील अंचलगाव येथे तलाठी आणि इतर कर्मचारी चक्क घोड्यावर फिरून हे पंचनामे पूर्ण करत असल्याचे दिसले. अधिकारी शेताच्या बांधावर घोड्यावर बसलेले पाहून ग्रामस्थ चांगलेच अचंबित झाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version