राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये – अशोक चव्हाण

राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये – अशोक चव्हाण

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा घेत असून संपूर्ण राज्यात ही महाजनादेश यात्रा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मतांसाठी हव्या तेवढ्या यात्रा काढाव्यात. मात्र राजधर्म विसरुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये असेही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

मतांसाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये –

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेवर आहेत.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अकोल्यात दाखल होण्यापूर्वी 6 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सरकारी अनास्थेमुळे 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा होती.

मात्र मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखलही घेतली नाही आणि शेतकऱ्यांना न भेटताच अकोला दौरा आटोपता घेतला असे अशोक चव्हाण म्हणाले.

राज्यात अनेक ठिकाणी भीषण पूर परिस्थिती असताना मतांसाठी महाजनादेश यात्रा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे.

मात्र शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नसल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version