Agriculture News: ‘पेरणीची घाई करू नये…’, मान्सूनपूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना मोठा इशारा

Agriculture News: ‘पेरणीची घाई करू नये…’, मान्सूनपूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना मोठा इशारा

राज्यात उकाड्याने सर्वच हैराण झाले आहेत. अशातच आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहीतीनुसार, 29 मेर्यंत राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मान्सून लवकर येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी पेरणीबाबत शेतकऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. 

मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी दिला आहे. "जोपर्यंत शेतात किमान 75 ते 100 मिलिमीटर पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची  घाई करू नये,पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकओढावू शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते", असे देखील त्यांनी म्हटले आहे.  

आगामी मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील तापमानात  मोठी घट होईल, ज्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून मोठा दिलासा मिळेल.राज्यातील काही भागांत जोरदार वादळी वारे   मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह  हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version