Farmers Long March: ‘लाल वादळ’ अखेर माघारी, तेरा दिवसानंतर किसान सभेचा धडक मोर्चा स्थगित

नाशिकमधून मुंबईच्या दिशेने निघालेलं शेतकरी आणि आदिवासी समाजाच लाल वादळ अखेर माघारी फिरलं आहे.
Farmers Long March: ‘लाल वादळ’ अखेर माघारी, तेरा दिवसानंतर किसान सभेचा धडक मोर्चा स्थगित

विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई असा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात दिंडोरी तालुक्यातून झाली असून, यात दिंडोरीसह सुरगाणा, कळवण, चांदवड, नांदगाव, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी यांसारख्या आदिवासीबहुल भागांतून हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत. 

हेही वाचा- Next Deputy Chief Minister: उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू? प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट
नाशिकमधून मुंबईच्या दिशेने निघालेलं शेतकरी आणि आदिवासी समाजाच लाल वादळ अखेर माघारी फिरलं आहे. तब्बल तेरा दिवस अखिल भारतीय किसान सभेचा धडक मोर्चा सुरु होता आता तो स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर आता हा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांच्या वनहक्क कायद्या पेसा संदर्भातल्या काही मागण्या होत्या याशिवाय शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा शेतकऱ्यांसाठीचे सिंचन। प्रकल्प हे लवकर पूर्ण करावेत अशा मागण्या घेऊन आणि अशा इतरही मागण्या होत्या. या सगळ्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी, हे शेतकरी आणि आदिवासी बांधव मुंबईच्या दिशेने चालत निघाले होते. आता या मोर्चा अखेर स्थगित झाला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version