जय महाराष्ट्र न्यूज, अकोला
अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबिन पिकाची अंत्ययात्रा काढली. अकोल्यामध्ये यंदा पावसाचा जोर खुप कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे
वाया गेल्याने शेतकऱी आर्थिक संकटात सापडला आहे.
निराश झालेल्या शेतकऱ्यांनी अकोल्यातील वाडेगाव परिसरात रस्त्यावर उतरून सोयाबीन पिकाची अंत्ययात्रा काढली. मानवी अंत्ययात्रेप्रमाणेच ही अंत्ययात्रा काढण्यात
आली. हजारोंच्या संख्येने शेतकरी यात सामील झाले होते.
सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत संपूर्ण गावात अंत्ययात्रा फिरवण्यात आली. सरकार आमचे अश्रू पुसणार का ?, सोयाबीन खल्लास तर शेतकरी खल्लास ! असे अनेक
फलक शेतकऱ्यांनी हातात घेतले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.