जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीत फूट पडली नसून गैरसमज निर्माण झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेत्या प्रतिभा शिंदेंनी दिलीय. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतरही सरकारला जाग येत नाहीय. त्यामुळे नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात शेतकरी आंदोलनाची बैठक पार पडली.
मात्र, या बैठकीला अनेक शेतकरी संघटनांचे नेते अनुपस्थित होते. शेतकरी कर्जमाफी नाही तर लूटमाफी मागत असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास 1 मार्चपासून आंदोलन करण्यात येईल. असा इशारा या बैठकीतून देण्यात आलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.