औरंगाबादमध्ये अल्पभुधारक शेतकऱ्याची आत्महत्या

औरंगाबादमध्ये अल्पभुधारक शेतकऱ्याची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

शेतकरी आत्महत्येचे सत्र अद्याप सुरुच आहे. अपुऱ्या पावसामुळे आणि सततच्या नापिकीमुळे राज्यभरात शेतकरी आत्महत्या करत आहेत. औंरगाबाद जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास एका अल्पभुधारक शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.  भानुदास फकिरा तुपे  असं या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे.

 

48 वर्षाच्या भानुदास तुपे यांनी पहाटे साडेपाच वाजता बांधावर असलेल्या पळसाच्या झाडाला फाशी घेऊन जीवनयात्रा संपविली. भानुदास तुपे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे राहणारे आहेत. त्यांच्यामागे त्यांची वृध्द आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

 

आत्महत्या करण्यापूर्वी भानुदास तुपे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, नापिकीमुळे झालेले कर्ज, महाराष्ट्र बँकेचे दिड लाख रूपये ,महिंद्रा फायनान्सचे एक लाख तीस हजार रुपयांचे कर्ज असुन हे फेडायचे कसे या त्रासातून त्यांनी आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version