कर्जबाजारीपणाला कंटाळून ‘त्याने’ मृत्यूला कवटाळले

कर्जबाजारीपणाला कंटाळून ‘त्याने’ मृत्यूला कवटाळले

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

बुलडाण्यातील रोहिणखेड तालुक्यात 23 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. अरविंद दळवी असे या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी आपल्याच शेतामध्ये कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या शेतक-यानं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललंय.

शेतकरी आत्महत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीनंतरही राज्यात आत्महत्यांचं सत्र सुरू असल्याने या आत्महत्या कधी थांबणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version