जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईत दाखल झालाय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेल्या हजारो शेतकऱ्यांचं लाल तुफान शनिवारी रात्री ठाणे शहरात दाखल झालं. हे लाल तुफान उद्या सोमवारी विधानभवनावर घोंगावणा आहे.
हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असलेले हे लाल वादळ शनिवारी रात्री ठाणे शहरात दाखल झाले. मोर्चेकऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. आता हे शेतकरी सोमवारी विधान भवनाला घेराव घालणार असून, त्यामुळे सोमवारी मुंबईतील रस्ते जाम होण्याची शक्यता आहे.
प्रखर उन्हात लॉंग मार्च सुरु असल्याने लॉंग मार्च मध्ये सामील असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या पायांना जखमा झाल्या आहेत. उन्हाचा असह्य चटका बसत असल्याने अनेक शेतकरी त्यामुळे आजारी पडत आहेत. नाशिक येथील एम.एस.एम.आर.ए. संघटनेने या शेतकऱ्यांसाठी आज उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.